Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडरायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप

रायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप

संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवडचा उपक्रम

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर
: जि.प.प्राथमिक शाळा जुम्मापट्टी ता.कर्जत जि.रायगड या शाळेतील इ.१ ली ते इ ७ वी पर्यंतच्या १५५ विद्यार्थी आणि जि.प.प्राथमिक शाळा पाषाणे ता कर्जत जि रायगड या शाळेतील इ १ ली ते इ ७ वी पर्यंतच्या १२७ विद्यार्थांना शालेय साहित्याचे वाटप केले. या दोन्हीही शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये पाटी, पेन्सिल , रंगपेटी, कंपासपेटी , पेन्सिल, वह्या, पुस्तके, खोडरबर इ.साहित्य दिले.


फेसबुक आणि वाॕटसपच्या माध्यमातून आणि संस्थेच्या सभासदांच्या सहकार्यातुन साहित्य जमा झाले होते. याचे संयोजन डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र फडतरे यांनी केले होते. सलग १८ वर्षे संस्कार प्रतिष्ठान हा उपक्रम राबवित आहे. यामध्ये विजय आगम, मिलन गायकवाड, मिनाक्षी मेरुकर, अर्पिता आजगावकर, रंजना गोराणे, विद्या भागवत, मनिषा आगम, नलिनी काकडे, सानिका सकपाळ, सेजल सकपाळ सांनी सहभाग घेतला होता.

प्रा.शाळा जुम्मापट्टीच्या मुख्याध्यापिका स्मिता म्हात्रे, गिता पाटील, माधुरी केदारी, छाया चव्हाण, वैशाली ढोले आणि प्रा. शाळा पाषाणे, मोहम्मद हुसेन, नसीर पटेल , मुख्याध्यापक दिलीप दुंदू गोतारणे, विषय शिक्षक सुदाम शंकर लांडे, उपशिक्षक कल्पना देवराम आंबरे, उपशिक्षिका यांनी संस्कार प्रतिष्ठानचे आभार मानले.

लोणावळा व्हिडिओ : भुशी डॅम ओव्हरफ्लो – चला पर्यटन करू

कोट्यावधी रुपये खर्च करूनही पवना इंद्रायणीला जलपर्णीचा विळखा

महाराष्ट्र : वैफल्यग्रस्त मोदी सरकारने केली लोकशाहीची निर्घृण हत्या

संबंधित लेख

लोकप्रिय