Wednesday, February 5, 2025

वृद्धी फाउंडेशनच्या वतीने राधा गाडे यांच्या वाढदिवसानिमीत्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

घोडेगाव : अनाठायी खर्च करून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भुमिकेतून कु.राधा अजित गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धी फाउंडेशन घोडेगाव यांच्या वतीने सरस्वती विद्यालय औदर तालुका खेड येथील आठवी ते दहावी विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पेन वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष प्रणय दरंदळे तसेच उपाध्यक्ष नितेश काळे व संचालक संदीप मेदगे सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक टाकळकर, देवरे, कदम, जाधव, लक्ष्मण मेदगे उपस्थित होते. सरस्वती विद्यालय औदर येथील शिक्षकांच्या वतीने वृद्धी फाउंडेशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच संचालक यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles