Friday, March 29, 2024
Homeग्रामीणरोटरी क्लब ऑफ जुन्नर च्या वतीने खामगाव येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य...

रोटरी क्लब ऑफ जुन्नर च्या वतीने खामगाव येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मास्कचे वाटप

जुन्नर : रोटरी क्लब ऑफ जुन्नर (शिवनेरी) यांच्या वतीने खामगाव येथे न्यु इंग्लिश स्कुल, खामगाव येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व मास्क वाटप करण्यात आले.

या वेळी रोटरीचे अध्यक्ष हितेंद्र गांधी, धनंजय राजुरकर, चेतन शहा, मिलींद घोडेकर, मानसी गांधी, खामगावचे उपसरपंच अजिंक्य घोलप, शाळेचे मुख्याध्यापक काकडे, शिक्षक खोत, गांगर्डे, गवते घोलप उपस्थित होते.

न्यु इंग्लिश स्कुल, खामगाव, ही शाळा पश्चिम भागात येत असल्याने येथे आदिवासी वाड्या-वस्त्यांमधील अनेक मुलं-मुली शिक्षण घेत आहेत. कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबां ची कौटुंबिक परिस्थिती बेताची बनली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अडचणी येऊ नये ही मदत करण्यात आली.

संस्थेची शाळा असल्याने शासकीय कुठला निधी किंवा फंड टाकता येत नसल्यामुळे विविध गोष्टींसाठी सामाजिक संस्था, CSR निधीवर अवलंबून राहून काम करावी लागतात. त्यामध्ये हितेंद्र गांधी व त्यांचा सर्व जुन्नर रोटरी क्लब, दिल्लीची टच अ लाईफ या संस्थेच्या माध्यमातून शाळेला वेळोवेळी मदत केली जाते.


संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय