Friday, March 14, 2025

आळंदीत आनंदाचा शिधा वाटपात प्रारंभ; महाराष्ट्र शासनाच्या योजनेचे स्वागत

आळंदी / अर्जुन मेदनकर : महाराष्ट्र शासनाच्या धोरणाप्रमाणे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील रेशन दुकानांत आनंदाचा शिधा वाटप करण्यास सुरवात झाली आहे. याच योजनेचा भाग आळंदीत पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा होळकर, शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण यांचे हस्ते तीर्थक्षेत्र आळंदीतील दयानंद तोडकर यांचे रेशनिंग दुकानातून शिधा वाटपास उत्साहात सुरुवात करण्यात आली. distribution of ration in Alandi

या प्रसंगी जिल्हा निरीक्षण अधिकारी सुरेश मुंडे, नायब तहसीलदार अंकुश कांबळे, साहेब दगडे, आळंदी मंडलाधिकारी स्मिता जोशी, तालुका पुरवठा अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अविनाश कुलकर्णी, पुणे जिल्हा रेशनिंग दुकानदार संघटनेचे प्रकाश खळदकर, खेड तालुका खरेदी वि. संघ संचालक बाळासाहेब पिंगळे, रेशनिंग दुकानदार दयानंद तोडकर, अमित उगले, प्रशांत गावडे, अमोल शेवकरी, अनिल कुऱ्हाडे, साहेब मरवडे, तलाठी बी. बी. पाटील, संतोष वीर, राजेश्वर पंपटवार, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, आळंदी धाम सेवा समितीचे विश्वस्त सचिन शिंदे, राजेंद्र साळुंके, कांताराम घुंडरे आदींसह रेशनिंग धारक उपस्तित होते.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

यावर्षीचे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनेतला आनंदाचा शिधा वाटपास सुरवात झाली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून पुणे जिल्ह्यातील रेशन दुकानांत आनंदाचा शिधा वाटप करण्यात आळंदीसह सुरवात करण्यात आली आहे. या आनंदाचा शिधा वाटपात या पूर्वी प्रमाणेच एक किलो चणा डाळ, रवा, साखर, तेल अशा प्रत्येकी एक किलो वस्तू वाटप करण्यात आले.   गोरगरिबांचा सण उत्सव गोड व्हावा. यासाठी शासनाने योजना सुरु केली आहे. गणेशोत्सवात अवघ्या शंभर रुपयात आनंदाचा शिधा वाटप केला जात आहे. 

गेल्या वर्षभरा पासून राज्य शासनाने आनंदाचा शिधा नागरिकांना देण्यास सुरुवात केली आहे. गणेशोत्सवा निमित्त शिधा शिधापत्रिकाधारकांना इ-पॉस प्रणालीद्वारे केवळ १०० रुपयांत वितरीत केला जात आहे. गणेशोत्सवा पूर्वी आनंदाचा शिधा घरोघरी पोहचावा यासाठी पुणे जिल्हा प्रशासन काम करीत आहे. आळंदीत देखील हे काम प्रभावी पाने सुरु करण्यात आले आहे. यासाठी आळंदीतील सर्व रेशनिंग दुकानदारांनी वितरणास सुरुवात केली असल्याची माहिती पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा होळकर यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या धोरणाप्रमाणे आळंदीत रेशनिंग धारकांनी आनंदाचा शिधा वाटप सुरु केले आहे. 

आळंदी पंचक्रोशीतील लाभार्थी रेशनिंग धारकांनी आपापल्या रेशनिंग दुकानातून आनंदाचा शिधा घेऊन जाण्याचे आवाहन शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण यांनी केले आहे. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा होळकर यांनी सुश्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. 

माऊली मंदिरात होळकर यांचा आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. खेड पुरवठा विभाग, रेशनिंग दुकानदार आणि संघटना यांचे वतीने देखील जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा होळकर यांचा सत्कार करण्यात आला. होळकर यांनी रेशनिंग दुकानदार यांचेशी संवाद साधून माहिती जाणून घेत योजनेची माहिती देऊन सुसंवाद साधला.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles