Friday, March 29, 2024
Homeग्रामीणणमोकार तीर्थ चांदवड तर्फे अपंगांसाठी मोफत कृत्रिम अंग वाटप

णमोकार तीर्थ चांदवड तर्फे अपंगांसाठी मोफत कृत्रिम अंग वाटप

चांदवड (सुनिल सोनवणे) : णमोकार तीर्थ चांदवड येथील पूज्य आचार्य देवनंदिजी महाराज गुरूभक्त परिवार व साधु वासवानी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व गरजू अपंग लोकांसाठी मोफत कृत्रिम पाय व हात वाटप शिबीर आयोजित केले आहे. सदर कृत्रिम पाय व हात अद्यावत तंत्रज्ञानाने बनविलेले फायबरचे असून वजनास अत्यंत हलके मात्र टिकावू व मजबूत असून प्रत्यारोपण केल्यानंतर अपंग व्यक्ती चालू शकते, सायकल चालवू शकते, टेकडी सुध्दा चढू शकते तसेच सर्व दैनंदिन कामे करू शकते.

सर्व वयोगटातील पुरुष आणि स्त्री रूग्णांचे मधुमेहामुळे, गॅगरीनमुळे किंवा कुठल्याही प्रकारच्या अपघातामुळे हात व पाय गमावले गेले असतील अशा सर्व रुग्णांना मोफत हात – पाय बसविण्यात येतील अशी माहिती चांदवड भूषण कासलीवाल यांनी दिली.  

या शिबिराचे आयोजन रविवार ता.१८ जुलै रोजी णमोकार तीर्थ, मुंबई – आग्रा हायवे नं.३, मालसाने, ता. चांदवड येथे सकाळी वेळ ९.३० पासून दुपारी १ पर्यंत आयोजित केलेले आहे. यामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून मोजमापे घेण्यात येतील व तयार झालेले कृत्रिम पाय व हात ३ ते ४ आठवड्यांनी मिळतील किंवा त्या आधी संबंधित व्यक्तीला संपर्क केला जाईल व सोशल मीडियाच्या माध्यमातून कळविले जाईल तसेच त्यासाठी लाभार्थ्यांना पुन्हा बोलविण्यात येईल व वाटप करण्यात येणार आहे.

लाभार्थीची नांव नोंदणी करण्यासाठी नितिन फंगाळ चांदवड ९४२३१८१००८/९६६६५५६५७४, राकेश जैन ९०१५९६७१०८ , ९४२२७४६४१३ , ९४२३४८४७०७ यांच्याकडे १७ जुलै २०२१ पर्यंत नोंद करावी लागणार आहे. तसेच, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, पुणे जिल्ह्यातील, व संपूर्ण महाराष्ट्रतील अधिकाधिक गरजू रूग्णांनी या पूर्णपणे मोफत शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेतर्फे वैशाली दिदी व निलम अजमेरा यांनी केले असून या संस्थेचे प्रमुख व को – ऑर्डीनेटर म्हणून ओम पाटनी इचलकरंजी मो.९३७२०४३६७० यांनी आपल्या आयोजकांतर्फे केलेले आहे. णमोकार तीर्थ प्रणेते परम पूज्य १०८ सारस्वताचार्य प्रज्ञाश्रमण श्री देवनंदिजी महाराज यांचा ५८ वा जन्म जयंती महोत्सव १५ ऑगस्ट २०२१ रोजी होणार आहे, त्यानिमित्त सदरचा कॅम्प आचार्य श्री देवनंदिजी महाराज गुरूभक्त परिवार यांनी आयोजित केलेले आहे.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय