Wednesday, February 19, 2025

दिव्यांग, निराधार नागरिकांना भोजन ब्लॅंकेट वाटप

नवजीवन दिव्यांग निराधार संस्थेमार्फत दिव्यांग व निराधारांना ब्लँकेटचे वाटप

पिंपरी चिंचवड : काळभोरनगर चिंचवड येथील नवजीवन दिव्यांग निराधार संस्थेमार्फत दिव्यांग तसेच निराधार नागरिकांना थंडीच्या बचाव पासून ब्लॅंकेट, मार्गदर्शक पुस्तिका ( जगण्याचा मार्ग ) याचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे यावेळी उदघाटक प्रा.दिपक जाधव म्हणाले की, आज अंधांच्या ब्रेल लिपीचा जनक लुई ब्रेल याची जयंती आहे. त्याने उठावदार लिपी तयार केली, तो फ्रान्समधील होता. या लिपीद्वारे अंध व्यक्ती हाताच्या बोटांनी उठाव टिंबांना स्पर्श करून लिपीतील लेखन वाचू शकले. अठराव्या शतकात व्हॅलेंटाइन हॉई ह्या फ्रेंच अंधशिक्षकास उठावदार लिपीतील अक्षरे अंधांना वाचता येतील, ही गोष्ट आढळून आली. कार्यक्रमास आलेल्या सर्व नागरिकांनी भोजन देण्यात आले. 

कार्यक्रम नवजीवन दिव्यांग निराधार संस्थेचे अध्यक्ष राहुल बिराजदार, उपाध्यक्ष स्वप्नील पवार, सचिव महादेव पवार, खजिनदार महेश केंद्रे, कार्यकारणी सभासद शबाना शेख, उमाकांत पाठक, सुरज जगदाळे, अमित आंग्रे, जुनेद शेख, अमोल सोनवणे, दीपक जाधव, रामकिसन केंद्रे, बंटी तुपे, प्रशांत सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे कामगार नेते अनुप  मोरे, सामाजिक कार्यकर्ते अजय काळभोर, अजित शितोळे, तसेच नगरसेवक शैलेश भाऊ मोरे, सामाजिक कार्यकर्ते विजय गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते करीम शेख यांचे मोलाचे योगदान लाभले.

कार्यक्रमांमध्ये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते, आणि टप्प्या टप्प्याने ४०० लोकांना याचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम किसन  केंद्रे आभार प्रदर्शन राहुल बिराजदार यांनी केले.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles