Saturday, December 7, 2024
Homeजिल्हासोलापूर जिल्हा प्रहार कडून सांगली जिह्यातील दुधगावात पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सोलापूर जिल्हा प्रहार कडून सांगली जिह्यातील दुधगावात पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सांगली : सोलापूर जिल्हा प्रहार कडून सांगली जिह्यातील दुधगावात पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

गेल्या आठ दिवसापूर्वी कोकणासह कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यात पावसाने थैमान घातले होते आणि भयंकर अशा महापुराने लोकांच्या आयुष्यात होत्याचं नव्हतं करून टाकलं. अनेक लोकांचे संसार उघड्यावर आले, अनेक लोकांना या प्रलयात जीवाला मुकावे लागले. अनेक लोकांवर निसर्गाच्या या आघातामुळे उपासमारीची वेळ आली, यात बाधित झालेल्या लोकांना सोलापूर प्रहार ने सामाजिक बांधिलकी जपत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. 

यात जीवनात उपयोगी वस्तूमध्ये 1000 चादरी, 500 साड्या दोनशे ते तीनशे किराणा किट, 200 टॉवेल, 200 टी-शर्ट, सॅनिटरी नॅपकिन, 20 क्विंटल तांदूळ, दोनशे बिस्कीट चे बॉक्स, 200 पाणी बॉक्स, 500 खाद्यान्नाची पाकिट, अशा अनेक छोट्या-मोठ्या जीवनोपयोगी वस्तूंची मदत घेऊन आज सांगली जिल्ह्यात प्रहारच्या टीम कडून ज्यांना खरंच मदतीची गरज आहे, अशा लोकांना समक्ष जाऊन वाटप करण्यात आले.

यावेळी प्रहार चे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील, शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, कार्याध्यक्ष खालिद मणियार, जिल्हा उपाध्यक्ष महेश शिंगाडे, संघटक दीपक नाईकनवरे, करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, नागेश शिंगाडे, राजू सावंत, बापू घोडके, युनूस पठाण, सोमनाथ जाधव, सोनू लोखंडे, अभिमान घंटे, सद्दाम शेख आदीसह उपस्थित होते.


संबंधित लेख

लोकप्रिय