जुन्नर (पुणे) : २६ नोव्हेंबर संविधान दिनी आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या शिरोली येेथील माजी विद्यार्थिनी अर्चना दिघे अनलॉक लर्निग वर्ग घेत आहेत. सदर वर्गास महिंद्रा CIE या चाकण येथील कंपनी कडून शैक्षणिक साहित्य व फळा भेट देण्यात आले. यावेळी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून विद्यार्थ्यांना संविधान समजून सांगण्यात आले.
तसेच हातविज, कोटामदरा, सितेवाडी, भोईरवाडी येथे अनलॉक लर्निग वर्ग घेत आहेत. त्यांना देखील फळा व शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. वृद्ध, दिव्यांग व विध्यार्थी यांसारख्या वंचित घटकांसाठी महिंद्रा कंपनी कडून नेहमीच पर्यावरण, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी योगदान दिले जाते.
यावेळी महिंद्रा कंपनीचे रोहित लामखडे, संदीप पानसरे, जुन्नर येथील बाल रोग तज्ञ डॉ. विनोद केदारी, माजी. मुख्याध्यापक आतार फकीर, आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या गृहपाल अर्चना पवार उपस्थित होत्या.