Monday, February 17, 2025

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुस्तके व शैक्षणिक साहित्याचे वाटप

कोल्हापूर : ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन, कोल्हापूरच्या वतीने शाहूवाडी तालुक्यातील कांडवण या गावी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महामानवांची जयंती 26 पुस्तके वाटून साजरी करुया, हा उपक्रम राबविण्यात आला. 

यामध्ये AISF च्या राज्य कौन्सिल सदस्या कॉम्रेड आरती रेडेकर यांनी संपादित केलेल्या साऊ पुस्तकाच्या प्रती उपस्थित महिला व मुलींना वाटण्यात आल्या. तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप सुद्धा करण्यात आले. 

यावेळी ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड प्रशांत आंबी, AISF चे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड हरीश कांबळे, योगेश कसबे, सुनील कोळी, उज्वला कांबळे, प्रिया कांबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 

हेही वाचा ! शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना ७५ व ८० टक्के अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी उपलब्ध

हेही वाचा ! तामिळनाडूच्या धर्तीवर रेशनदुकानात जीवनावश्यक पुरवठा करण्याची मागणी

Related Articles

- Advertisement -

Latest Articles