Wednesday, June 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

काळीमा फासणार घटना ! २५ वर्षीय महिलेच्या घरात घुसून सामुहिक बलात्कार

---Advertisement---

---Advertisement---

पुणे : पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका कॉलनीतील २५ वर्षीय महिलेच्या घरात घुसून चौघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे. सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणातील चारही आरोपींना अटक केली असून पोलीस त्यांची कसून चौकशी करीत आहे.

हे वाचा ! जुन्नर : वृध्द दांपत्याला मारहाण करून लूटणारी टोळी अटकेत !

मिळालेल्या माहितीनुसार, काल शुक्रवारी दिनांक 27 रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास एका महिलेने दत्तवाडी पोलिसांना फोन केला की, एका महिलेचा घरातून रडण्याचा आवाज येत आहे. तिला मदतीचा गरज असल्याचा फोन आला. तेव्हा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतला असता. तिथे सात – आठ महिला घराजवळ थांबलेल्या होत्या. त्या घराजवळ गेल्यावर पोलिसांनी आतमधील महिलेला आवाज दिला.

महत्त्वाची बातमी ! वाहनांच्या क्रमांकात होणार मोठा बदल

तेव्हा देखील रडण्याचा आवाज येत होता .पण काही केल्या दरवाजा उघडला गेला नसल्याने पोलिसांनी त्यावर अखेर दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता पीडित महिलेसह चार आरोपी आढळून आले. त्यानंतर तात्काळ पीडित महिलेला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. चारही जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles