Thursday, August 11, 2022
Homeजुन्नरप्रहार जनशक्ती रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्राच्या बैठकीत विविध...

प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्राच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

spot_imgspot_imgspot_imgspot_img

जुन्नर : प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रृपची रविवारी बैठक पार पडली. यावेळी दिव्यांग, बेघर, घुणीभांडी कामगार, संजय गांधी पेन्शन, श्रावण बाळ पेन्शन धारकांना येणाऱ्या अडचणी तसेच तहसीलदार यांच्या सहीचा उत्पन्न दाखला काढण्यासाठी येणाऱ्या अडचणी अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

संस्थेचे नवनिर्वाचित सदस्य महमंद रफीक शेख यांची पुणे जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली तसेच सदस्यपदी बाळु कोकाटे, विनायक शिंदे, सुरेखा नवले निवड करण्यात आली. आंबेगाव तालुका अध्यक्षपदी फरहान मीर अली खान यांची निवड करण्यात आली. जुन्नर शहर बेघर महिला व घुणीभांडी संघटना उपाध्यक्षापदी गायत्री गिरी यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण, अध्यक्ष अरूण शेरकर, उपाध्यक्ष राहुल मुसळे, पुणे जिल्हा अध्यक्ष अजिज पठाण, जुन्नर तालुका अध्यक्ष अनंत हाडवले, सुनिल जंगम, सौरभ मातेले, शेख अहमद इनामदार, नफिसा कुरैशी, ओमकार शिंदे, तबाजी आरोटे, अनसार सौदागर, जाधव साहेब, हनुमंत थोरवे, हरीभाऊ नायकोडी, महिला बेघर संघटना जुन्नर तालुका अध्यक्षा नफिसा इनामदार तसेच दिव्यांग कार्यकर्ते व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय