Wednesday, February 5, 2025

जुन्नर तालुक्यातील दिव्यांगांचा लसीकरणास प्रतिसाद !

जुन्नर, दि. २२ : जुन्नर शहर व जुन्नर तालुक्यातील दिव्यांग लोकांना शासनाच्या आदेशानुसार वय 30 ते 44 वयोगटातील दिव्यांग लोकांना लसीकरण संपन्न झाले. यावेळी दिव्यांगांनी लसीकरणाला प्रतिसाद देत लसीकरण करुन घेतले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ. आर, एस, सरवदे, डाॅ. डी. के. कोकाटे, परिचारिका एस. पी. शिंंदे  यांचे विशेष योगदान लाभले.

यावेळी प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण संघटना चे पदाधिकारी दिपक चव्हाण, अध्यक्ष अरूण शेरकर, उपाध्यक्ष राहुल मुसळे, दत्तात्रय हिवरेकर, राष्ट्रवादी अपंग सेल पुष्पा गोसावी, सुनिल जंगम, स्वप्निल लांडे, शेख अहमद इनामदार, शुभागी लांडे, सविता दुराफेे, सुहास शेटे व मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापिका आमेंठवार आदींचे सहकार्य आणि योगदान लाभले.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles