दिघी : नवीन वर्षाच्या सुरुवातीला शहरातील महामानवाच्या प्रतिमांची व नाम फळकांची साफ सफाई करून त्यांच्या विचारांना आणि प्रतिमांना विनम्र अभिवादन करून दिघी विकास मंचचा २ रा वर्धापन दिन एक आगळा वेगळा उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
या वेळी मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ लबडे, उपाध्यक्ष धनाजी खाडे, सचिव समाधान कांबळे, सहसचिव अभिमन्यू दोरकर, खजिनदार दत्ता घुले, सह खजिनदार नामदेव रडे, सदस्य कुंडलिक जगताप सर, रमेश विरणक व मार्गदर्शक सुनील काकडे आदी सभासद सहभागी झाले होते.
दिघी विकास मंच हि एक सामाजिक कार्य करणारी संघटना आहे. मंचच्या वतीने वर्ष भर विधायक कामे करण्यावर भर दिला जातो.
त्यामुळे वर्षाची सुरुवात आणि मंचचा वर्धापन दिनाचं औचित्य साधून महामानवांच्या पुतळ्याची व नाम फलकांची स्वच्छ्ता करून नवीन वर्ष व वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्याच प्रमाणे आजच्या ‘दिनविशेष’ म्हणजे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित दिघी पोलिस स्टेशनला जाऊन सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा गुलाब पुष्प देऊन दिघी विकास मंचच्या वतीने सन्मान करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या.