दिघी, दि. २२ : घेऊ पुस्तक दान, करु वही प्रदान” दिघी विकास मंच हा अभिनव उपक्रम राबवत आहे.
कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत, ऑनलाईन शिक्षणामुळे पाठ्यपुस्तकांचा वापर कमी प्रमाणात झाला आहे. म्हणूनच शालेयपुस्तके रद्दीत न देता दान करा असे आवाहन दिघी विकास मंचच्या वतीने दिघीतील नागरिकांना करत, घेऊ पुस्तक दान, करू वही प्रदान. या उपक्रमाच्या माध्यमातून सामान्य, गरिब, होतकरू, गरजुवंत विद्यार्थांच्या पंखाना या दानरुपी मदतीमुळे शिक्षणासाठी नक्कीच बळ मिळणार आहे.
या उपक्रमात आपणही सहभागी व्हावं आणि आपल्या ओळखीच्या मित्रपरिवारांना, नातेवाईकांना दान करण्यास सांगावं. आपण केलेली ही छोटीशी मदत नक्कीच आयुष्य घडू शकेल, असे आवहानाही करण्यात आले आहे.
तसेच शालेय पुस्तके दान करणाऱ्या पालकानां मंचच्या वतीने १२ (१ डझन) शालेयवहीचा संच प्रधान करण्यात येणार आहे.