दिघी : करोना संसर्ग रोगामुळे तब्बल दिड वर्षा पासून बंद आसलेली मंदीरे घटस्थापनेच्या मुहूर्तावर भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आल्याने भाविकानमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिघीतील नागरिकांचे श्रध्दास्थान असलेलं प्रसिध्द श्री दत्त मंदीर करोना नियमांचे पलन करत भाविकांच्या उपस्थित खुले करण्यात आले. तसेच पहाटे देवाची महाआरती, हरिपाठ, तसेच राजगिरा लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी मंदिरा मध्ये भक्ती गीते तसेच भव्य रांगोळी रेखाटण्यात आली होती. यावेळी दत्त सेवा मंदीराचे विश्वस्थ आनंदा घुले, दत्ता घुले, महादेव निदाणे, ईश्वर सांवत, सिध्दार्थ गायकवाड, मनोहर घुरमे आदी सेवक उपस्थीत होते.