‘गोपीचंद पडळकर याच्या भावाने सांगलीमध्ये काय केले याची माहिती मी घेणार आहे. पदावर असलो म्हणून नातेवाईकांनीही नीट वागले पाहिजे. हे सध्याच्या काळात होत नाही.लोकप्रतिनिधी झाला म्हणजे शिंगे फुटली असे होत नाही, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली. अजित पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना अजितदादांनी भाजपवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात विचित्र राजकारण सुरू आहे.
हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. महापुरुषांबाबत वारंवार अपशब्द बोलले जातात. मुद्दामहून ठरवून करता का? शिवाजी महाराजांबबत वाईट शब्द वापरले तर दिलगिरीही व्यक्त करत नाहीत.
माणूस आहे माणूस चुकतो पण हे थांबायला तयार नाहीत. महात्मा फुले त्यावेळी श्रीमंत होते त्यांनी पैसा समाज्याला दिला. त्याला तुम्ही भीक म्हणता. अजित पवार कुणाला घाबरणारा माणूस नाही, असं म्हणत अजितदादांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
लोकप्रतिनिधी झाला म्हणजे शिंगे फुटली का? अजितदादांनी गोपीचंद पडळकरांना फटकारलं
- Advertisement -