Dhruv Rathee and kunal kamra : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या अलीकडील वादग्रस्त वक्तव्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले असताना, प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी याने या प्रकरणात उडी घेतली आहे. कुणाल कामराने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एका व्यंगात्मक गाण्यातून टीका केल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी त्याच्या मुंबईतील स्टुडिओवर हल्ला करत तोडफोड केली. या घटनेनंतर ध्रुव राठीने कुणालच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने ठामपणे उभे राहत त्याला पाठिंबा दर्शवला आणि आर्थिक मदतही पाठवल्याची माहिती समोर आली आहे. (हेही वाचा – खासदारांच्या पगारात घसघशीत वाढ; भत्त्यासह पेन्शनही वाढली)
वाद कसा सुरू झाला?
२३ मार्च रोजी कुणाल कामराने एका स्टँडअप शोमध्ये ‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील गाण्याच्या धुनेवर आधारित एक पैरोडी सादर केली. या गाण्यात त्याने एकनाथ शिंदे यांना ‘ठाण्याचा रिक्षावाला’ आणि ‘गद्दार’ असे संबोधून २०२२ मध्ये शिवसेनेत झालेल्या बंडखोरीचा उल्लेख केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिंदे समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली. शिवसेना कार्यकर्त्यांनी खार येथील स्टुडिओवर हल्ला करत तिथली तोडफोड केली, तसेच त्याला माफी मागण्याची मागणी केली. (हेही वाचा – प्रशांत कोरटकरला अटक, तेलंगणातून घेतले ताब्यात)
ध्रुव राठीची प्रतिक्रिया | Dhruv Rathee
या प्रकरणावर ध्रुव राठीने सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि कुणालच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पाठिंबा दिला. ध्रुव राठीने आपल्या एक्स अकाऊंटवर कुणाल कामराच्या स्टेटमेन्टला रिपोस्ट करत ‘हे खरे ५६ इंचाचे धाडस आहे’ असे म्हणत पुढे जाळाची इमोजी वापरली आहे. या सोबतच ध्रुव राठीने युट्यूब चॅनेलवर कामराला 29.99 युरो पाठवले आहे. जे भारतीय रूपयांत 2700 रूपये आहेत. पुढे इंन्कलाब जिंदाबाद लिहले आहे. (हेही वाचा – न्यायाधीशाच्या घरी सापडले तब्बल 15 कोटीची रोख रक्कम, घरात आग अन्…)
या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी कुणालविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली असून त्याला चौकशीसाठी समन्सही बजावले आहे. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी कुणालच्या समर्थनार्थ आवाज उठवला आहे. राऊत यांनी या हल्ल्याला ‘कायरतापूर्ण’ संबोधत “गद्दाराला गद्दार म्हणणे हा गुन्हा नाही,” असे म्हटले. (हेही वाचा – न्यायाधीशाच्या घरी सापडले तब्बल 15 कोटीची रोख रक्कम, घरात आग अन्…)