Wednesday, April 24, 2024
HomeNewsधोनीच्या पत्नीची 10 महिन्यांनंतर पोस्ट, ट्वीट करत सरकारला विचारला जाब

धोनीच्या पत्नीची 10 महिन्यांनंतर पोस्ट, ट्वीट करत सरकारला विचारला जाब

रांची : देशातील अनेक राज्यांना सध्या वीज संकटाचा सामना करावा लागतो आहे. यात महाराष्ट्राप्रमाणेच झारखंडमध्ये वीज संकट निर्माण झाले आहे. या भारनियमावरून भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षीने थेट सोशल मीडियावरून सरकारला जाब विचारला आहे.

झारखंडमध्ये एकीकडे उष्णतेमुळे अवस्था बिकट आहे. त्यात वीज संकटामुळे लोक अस्वस्थ झाले आहेत. यावरून धोनीने साक्षी ट्विटकरून सरकारला जाब विचारला आहे. साक्षीने ट्विटमध्ये लिहिले की, झारखंडची एक करदाती म्हणून फक्त मला हे जाणून घ्यायचे आहे की येथे इतक्या वर्षापासून वीज संकट का आहे? आम्ही जाणीवपूर्वक खात्री करत आहोत की आम्ही उर्जेची बचत करत आहेत, असे ट्वीट केले आहे. 

नवनीत राणा यांच्या गंभीर आरोपानंतर संजय पांडे यांनी शेअर केला व्हिडिओ, राणा दाम्पत्याचा खोटारडेपणा उघड ?

अंगणवाडी कर्मचारी व मदतनीस यांना ग्रॅच्युईटी चा लाभ देण्याचे निर्देश, सिटू संघटनेच्या प्रयत्नांना यश – डॉ.डि.एल. कराड

सततच्या लोडशेडिंगमुळे राज्यातील जनता हैराण झाली असल्याने साक्षीने जवळ जवळ 10 महिन्यांनंतर पहिल्यांदाच ट्वीट करत सरकारला प्रश्न केला आहे. 

राज्यातील वीज संकटावर बोलण्याची साक्षीची ही पहिली वेळ नाही. याआधी २०१९ साली साक्षीने सोशल मीडियावरून प्रश्न विचारला होता. साक्षीच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

DYFI राज्य अध्यक्षपदी नंदकुमार हडळ तर राज्य सचिवपदी बालाजी कलेटवाड

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय