पुणे : पहिल्याच दिवशी ‘धर्मवीर’ सिनेमाने जवळपास 10 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. पण आणखी मोठा टप्पा अद्याप सिनेमाला गाठायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे शनिवार, रविवार असल्यामुळे सिनेमा किती मजल मारेल हे पाहाण महत्त्वाचं ठरणार आहे.
आनंद दिघे यांच्या राजकीय कारकिर्दीत नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या आणि त्या प्रत्येक प्रसंगाला ते कसे सामोरे गेले हे सर्वच या चित्रपटातून साकारण्यात आलं आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओक यानं मध्यवर्ती भूमिका साकारली आहे.
प्रसादने साकारलेले आनंद दिघे पाहताना त्यानं या व्यक्तीरेखेसाठी घेतलेली मेहनत लगेचच लक्षात येत आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणं, हिंदूच्या पाठी ठाम उभं राहाणं, महिलांना सुरक्षितता देणं, सामाजिक तंटे सोडवणं, ठाण्याचा विकास करणं अशी अनेक कामं दिघेसाहेबांनी केली आहेत.