गेवराई : पंचशील बुद्ध विहार मालेगाव खुर्द तालुका गेवराई जिल्हा बीड येथे अशोका विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८.३० वाजता समता सैनिक दलाच्या गेवराई तालुका सचिव शितल निकाळजे यांच्या हस्ते धम्म ध्वज ध्वजारोहण करण्यात आला. त्यानंतर तथागत बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुष्प पूजा करून भंते निवास बांधकामाचे उद्घाटन सरपंच संभाजी दूधसागर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पासाहेब खरात संचालक जय भवानी सहकारी साखर कारखाना लिमिटेड गढी तसेच उत्तम खरात माजी चेअरमन सेवा सहकारी सोसायटी, मालेगाव खुर्द ग्रामपंचायत सदस्य भागवत खरात, ज्ञानेश्वर खरात, ज्ञानेश्वर निकाळजे, आबासाहेब गिरी, शिवाजी खरात, रंगनाथ खरात, नाथाजी निकाळजे, अंशीराम निकाळजे, भाऊसाहेब निकाळजे, बाबासाहेब शिरसाट, अनिल निकाळजे, सतीश निकाळजे, विठ्ठल निकाळजे, सुदर्शन निकाळजे, आजिनाथ खंडागळे उपस्थित होते.
सायंकाळी सार्वजनिक बुद्ध वंदना घेऊन अशोका विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन या विषयावर भारतीय बौद्ध महासभा गेवराई तालुका अध्यक्ष खंडागळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी श्रुती निकाळजे, शितल निकाळजे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले, यावेळी समाजबांधव उपस्थित होते.