Friday, March 29, 2024
Homeजुन्नरजुन्नर : देवराम लांडे यांच्या नावाला काळे फासले!

जुन्नर : देवराम लांडे यांच्या नावाला काळे फासले!

जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील आपटाळे, सुराळे, निरगुडे – बेजवाट, सोमतवाडी येथील एसटी बसथांब्यावर टाकण्यात आलेल्या पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या नावाला शनिवारी (ता.६ ऑगस्ट) विरोधकांकडून काळे फासण्यात आले.

विरोधकांकडून दोन दिवसांपूर्वी प्रशासनाला सांगण्यात आले होते की, प्रशासनाने जर कारवाई केली नाही, तर आम्ही स्वतः नावाला काळे फासणार. त्यानुसार बस थांब्यावर टाकण्यात आलेल्या देवराम लांडे यांच्या नावाला काळे फासण्यात आले.

आदिवासी भागातील एसटी बसथांब्याची दुरुस्ती व रंगरंगोटीचे काम पुणे जिल्हा परिषद निधीतून नुकतेच करण्यात आले होते. जिल्हा परिषद निधीतून थांब्याच्या केलेल्या कामाबद्दल देवराम लांडे यांच्या विशेष प्रयत्नातून केले असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. बस थांब्यावरील गावचे नाव लहान अक्षरात, तर स्वतःचे नाव मोठ्या अक्षरात टाकल्याने हा बस थांबा की निवडणुकीच्या प्रचाराचा बोर्ड आहे, असा सवाल देवराम लांडे यांचे विरोधक काळू शेळकंदे, दत्ता गवारी, मारुती वायाळ यांनी केला आहे.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि सदस्य देवराम लांडे यांनी शासकीय पैशातून मतदारसंघ आपल्या नावाने रंगवून काढण्याचे काम सुरू केले असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. स्वतःला शेठ, आदिवासी वादळ, माजी अध्यक्ष, गोरगरिबांचा कैवारी, युवकांचे आशास्थान अशा उपमा लावण्यासही ते विसरले नसल्याचीही टिका विरोधकांकडून केली जात आहे.

विरोधकांनी याबाबत पंचायत समिती कार्यालयाकडे विचारणा केली असता जिल्हा परिषदेच्या विकास कामांवर लोकप्रतिनिधींची नावे टाकण्याबाबत सरकारचे कोणतेही परिपत्रक नाही. विकास कामांवर लोकप्रतिनिधींची नावे टाकता येत नाहीत; परवानगी घेऊनच नावे टाकता येतात. मात्र, लांडे यांनी अशी परवानगी घेतल्याची माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय