Thursday, December 12, 2024
Homeताज्या बातम्याDevendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक क्षण आज मुंबईच्या आझाद मैदानावर घडला. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या भव्य शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देशातील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

महायुती सरकारच्या या शपथविधी सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज आणि तब्बल चाळीस हजार नागरिकांनी हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी घेतली, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन विक्रम केला आहे. (Devendra Fadnavis) 

आझाद मैदानावर या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन अतिशय भव्य स्वरूपात करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या बहिणींचीही या सोहळ्याला विशेष उपस्थिती होती. या प्रसंगी महाराष्ट्रातील जनतेला एकत्र आणण्यासाठी महायुती सरकारच्या कार्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या शपथविधीने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण मिळाल्याचे बोलले जात आहे.

(Devendra Fadnavis) 

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला, कुणाला किती मंत्रीपदं मिळणार?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून आढावा

मोठी बातमी : महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

मोठी बातमी : बॉटल बंद पाणी ‘अतिधोकादायक’ यादीत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार ? महत्त्वाची माहिती समोर

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय