Tuesday, October 8, 2024
HomeराजकारणDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेचं नाव उघड करण्यास नकार,...

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेचं नाव उघड करण्यास नकार, पोलिसांचीही चौकशी होणार?

Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका महिलेने तोडफोड केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मंत्रालयात तगड्या सुरक्षेच्या व्यवस्थेमध्ये ही महिला फडणवीसांच्या कार्यालयापर्यंत कशी पोहोचली, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, या घटनेवेळी महिला पोलिस कर्मचारी उपस्थित नसल्याने ती महिला पोलिसांच्या देखत मंत्रालयातून सहजपणे निसटली. या घटनेमुळे सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी सुमारे पावणेसात वाजता हा प्रकार घडला. या महिलेनं पर्स आत राहिल्याचं कारण सांगून गेटपास न घेता सचिवालयात प्रवेश केला. त्यानंतर सहाव्या मजल्यावरील देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयापाशी पोहोचली आणि तेथील नेमप्लेट काढून फेकली. आणि शोभेच्या झाडांच्या कुंड्यांची तोडफोड केली. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच तपास सुरु केला आणि 18 तासांच्या आत महिलेची ओळख पटवली. मात्र, पोलिसांनी तिचं नाव उघड करण्यास नकार दिला आहे, ज्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

या घटनेमुळे मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेवर शंका उपस्थित झाली आहे. फडणवीस यांचे कार्यालय हाय सिक्युरिटी झोनमध्ये येते, तरीही त्या महिलेला प्रवेश कसा मिळाला, याची चौकशी होणार आहे. तसेच, ही घटना घडली त्यावेळी या परिसरात बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे समजते.या महिलेविरोधात ट्रेस पासिंग आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, लवकरच तिच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती आहे.

Devendra Fadnavis

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

संजय राऊत यांना कोर्टाकडून 15 दिवस कैद, 25 हजारांचा दंड

मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप

धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू

भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार

अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध

मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर

अक्षय शिंदेचा पोस्टमार्टम रिपोर्ट, अति रक्तस्रावामुळे मृत्यू

धक्कादायक : बेंगळुरूमध्ये महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे फ्रिजमध्ये आढळले

गुजरातच्या रिया सिंघाने जिंकला मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा ताज

जगातील सर्वात जास्त मागणी असलेला महागडा ट्यूना मासा

संबंधित लेख

लोकप्रिय