जुन्नर : जुन्नर येथे देवस्थान इनाम वर्ग ३ च्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक आज (दि.३) प्रभाकर संझगिरी भवन, बेळेआळी येथे किसान पुणे जिल्हा किसान सभेच्या नेतृत्वात पार पडली. मोठ्या संख्येने जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांमधून शेतकरी या बैठकीसाठी उपस्थित होते.
यावेळी बोलताना किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे म्हणाले, देवाच्या सेवकांना पृथ्वीवर जमीन नाही.? इनाम वर्ग ३ जमिनी कसतो आहोत पण त्या जमिनीमध्ये सुधारणा करता येत नाही. आम्हीही पिके पिकवतो पण नुकसान झाले तर नुकसान भरपाई नाही. जमिनीवर ना कर्ज मिळते. ना पिकांचा विमा. यासारख्या अनेक प्रश्नांनी ग्रस्त असलेल्या या या शेतकऱ्यांच्या व्यथा पुणे जिल्हा किसान सभेने महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या मार्गदर्शनाने पुणे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्या दरबारी वेळोवेळी मांडल्या. पण यावर कोणतेही निर्णय होऊ शकलेले नाहीत.
या जमिनी कोणत्याही अटी आणि शर्तींशिवाय वहिवाट धारकांच्या नावे कराव्यात. या मागणीसाठी देवस्थान इनाम वर्ग -३ चे शेतकरी यांनी मोठ्या संख्येने आगामी अकोले ते लोणी या पायी लॉंगमार्चमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सहसचिव आणि पुणे जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे यांनी या वेळी केले.
यावेळी पुणे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना या लॉंग मार्च मध्ये सहभागी करण्यासाठी देवस्थान इनाम वर्ग ३ च्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मोहीम राबविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
या बैठकीला महाराष्ट्र राज्य किसान सभेचे जिल्हा सचिव विश्वनाथ निगळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तालुका अध्यक्षा माधुरी कोरडे, सचिव लक्ष्मण जोशी, उपाध्यक्ष मुकुंद घोडे, कार्याध्यक्ष कोंडीभाऊ बांबळे, कोषाध्यक्ष नारायण वायाळ, इनाम वर्ग ३ चे शेतकरी असिफभाई शेख, नजीर मंहम्मद शेख, जब्बार बालाभाई इनामदार, मुलानी इम्तियाज नबीलाल मोमीन अ.हमीद महंमद, इब्राहीम ईस्माइल शेख, नसीर चांदखान इनामदार, आयुब फत्तेखान इनामदार, नाजीरभाई उसेक, हुसेन सदनमिया इनामदार, सादिक पिरमहंमद मोमीन, आसिफ रमजान शेख, इनामदार सर आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.
---Advertisement---
---Advertisement---
इनाम वर्ग ३ च्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांचा निर्धार; अकोले ते लोणी पायी मोर्चात सहभागी होणार
---Advertisement---
- Advertisement -