Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

महाराष्ट्रात जातीय, धर्मांध दंगली घडवू पाहणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावा – DYFI

---Advertisement---

---Advertisement---

बीड / अशोक शेरकर : भारतीय राज्यघटनेने सर्व धर्माना त्यांचं स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे.वर्षानुवर्षे विविध धार्मिक स्थळावरील भोंगे असतील हे त्यांच्या प्रार्थनेच्यावेळी चालतच आलेले आहे. अचानक रमजानच्या काळात जाणीवपूर्वक मस्जिदीवरील भोंग्याचे राजकारण राज्यात पेटवून राज्यातील सलोखा बिगडवण्याचे व जनतेच्या मनात भीतीसदृश्य वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) चे सरकार मात्र निमूटपणे मूग गिळून गप्प बसलेले आहे.त्यामुळे राज्यातील आणि जिल्यातील युवकांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रात जातीय आणि धर्मांध दंगली घडवून आणणाऱ्याचे मनसुबे उधळून लावा असे आव्हान डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (Democratic Youth Federation Of India) या युवक संघटनेच्या बीड जिल्हा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

ज्यांना कोणाला भोंगे लावायचे तर खुशाल लावू द्या, ज्यांना कोणाला हनुमान चालीसा वाचायची तर खुशाल वाचू द्या, कट्टरवादी मुस्लिम, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारी नेतेमंडळी गरळ ओकू द्या,धर्म कोणताही असो ज्यांना धर्माचे ज्ञान आहे ते शांत आहेत.आणि ज्यांना धर्माचा ध माहीत नाही ते धर्म खांद्यावर घेऊन फिरत आहेत. शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात हे दुर्दैव आपण पाहतो आहोत. 

भोंग्याच्या वादावर अभिनेता सोनू सूदने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…

परंतु सुशिक्षित विचारशील तरुणांनो, यामुळे आपल्या शेतकरी बापाच्या शेतीमालाला भाव मिळणार नाही, आपल्या हाताला काम मिळणार नाही. हनुमान चालीसा वाचल्याने माझ्या घरची चुल महागाई मुळे बंद होणार ती चालु राहील का? हनुमान चालीसा वाचल्याने माझ्या हातात काय येईल मला रोजगार मिळेल का? यांना आपल्या रोजगाराची चिंता नाही, नसणार कारण हे कुठे बेरोजगार आहेत, यांना आपल्या शेतकरी बापाची चिंता नाही. कारण ह्यांनी कुठे नांगर हाणलाय. यांना पेट्रोल डिझेल घरगुती गॅस दरवाढ दिसत नाही. 

यामुळे तुम्ही शिक्षण, रोजगार, महागाई बेरोजगारी यावरून आपले लक्ष विचलीत होवू देवू नका.कारण शिक्षण हाच तुमच्या उद्धाराचा मार्ग आहे. तुम्ही चांगले शिकून सवरून स्वत:चे आयुष्य घडविले तर आई वडिल, नातेवाईक व समाज यांना मदतीचा हात देवू शकता. तुम्ही एम.पी.एस.सी., पोलिस सेवा, महसूली सेवा, अथवा खाजगी उद्योगात इंजीनीयर, मॅनेजर, तंत्रज्ञ म्हणून लागलात तर तेथील ‘सिस्टिम’आपल्याला समजून येते. तुम्ही वकील, डॅाक्टर, सी ए झालात तर न्यायव्यवस्था कशी आहे हे लक्षात येते. 

बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत विविध 112 पदांसाठी भरती, 9 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख

आरोग्य व्यवस्था, आर्थिक व्यवस्था यांचा अभ्यास यांचा अभ्यास करता येईल. शिक्षक, प्राध्यापक झाला तर विज्ञानवादी समाज घडवाल, लक्षात ठेवा, तुम्हाला देशाचे आदर्श नागरिक म्हणून पुढे यायचे आहे. हनुमान चालीसा वाचणे, भोंगे लावणे, जातीय दंगली करणे त्यांनाच करू द्या. ज्यांची लेकरं या सगळ्या पासून दूर आहेत, ज्यांनी आपणास हजारों वर्षे शिक्षणापासून मुद्दाम वंचित ठेवले होते आज तेच विध्वंशाच्या  मार्गावर नेत आहेत. म्हणून आपल्यवर फार मोठी जबाबदारी आलेली आहे, ती म्हणजे चांगले शिकून सवरून भारतीय संविधानाचे रक्षण करायचे. संसदीय लोकशाही टिकवायची आहे.

सुशिक्षित तरुणांनो, या देशाचे भवितव्य आपल्या हातात आहे.यासाठीच आपण उच्च शिक्षण घेवून महापुरुषांच्या स्वप्नातील महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी आपण एकत्र राहु. व जातीय, धर्मांध दंगली घडवून पाहणाऱ्याचे मनसुबे उधळून लावु.असे आवाहन डीवायएफआयचे जिल्हा अध्यक्ष मोहन जाधव जिल्हा सचिव विशाल देशमुख, सय्यद याकूब, देवदास जाधव, विनायक चव्हाण, सुहास चंदनशिव, मनोज देशमुख, मनोज स्वामी, बाळासाहेब शेप, विजय राठोड, कुंडलिक खेत्री, सुहास जायभाये, प्रशांत मस्के, भाऊसाहेब रणदिवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांची फसवणूक मंत्र्यांनी करू नये; पीएचडी संशोधक अधिछात्रवृत्ती तात्काळ द्या – आमदार विनोद निकोले

---Advertisement---

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांसाठी भरती, 8 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles