पुणे/क्रांतिकुमार कडुलकर: राजापुर,जिल्हा रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांची घातपात करून अपघातामध्ये निर्घुण हत्या करण्यात आली याचे निषेधार्थ क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले समता मंच, पुणे यांच्या वतीने काल दि.१२/०२/२०२३ रोजी सायंकाळी ५ वा. संभाजीराजे चौक, दिघी, पुणे येथे निदर्शने करून निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. उपस्थित मान्यवर अॅड. शाहिद आख्तर, अॅड. जितेंद्र कांबळे, अश्विनी कांबळे, सुनिल काकडे, रवि चव्हाण, उत्तम घुगे, संतोष जाधव, हरिभाऊ लबडे इत्यादींनी पत्रकाराच्या हत्येचा निषेध करून श्रध्दांजली वाहिली.
पत्रकार संरक्षण कायदा कडक करण्यात यावा, अन्यायाविरूध्द लढणाऱ्या पत्रकारांना त्वरीत पोलीस संरक्षण देण्यात यावे. शहिद पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येमागच्या मुख्य सुत्रधारांना त्वरीत अटक करण्यात यावे. तसेच शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबियांना सरकारने रु.५०,००,०००/- ची मदत त्वरीत करावी इत्यादी मागण्या या प्रसंगी मा. जिल्हाधिकारी, पुणे यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण मोरे,आशा सुरवाडे, केशव वाघमारे, लता मोरे, अॅड. धोत्रे, चंदा सुरवाडे, विशाल धुळधुळे, आशालता बनसोडे, रजाने सह परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
“पत्रकाराच्या हत्येच्या निषेधार्थ निदर्शने, निषेध सभा
- Advertisement -