नागपूर : भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व भारतीय कम्युनिस्ट पक्षाने संयुक्तपणे रामटेक तहसील कार्यालयासमोर महागाई व बेरोजगारी च्या विरोधात दुपारी एक वाजता चा सुमारास जोरदार निदर्शने केली.
पेट्रोलियम पदार्थांवरील सर्व प्रकारचे सेस / सरचार्ज मागे घ्या, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गव्हाचे वितरण पूर्ववत करा, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत सर्व जीवनावश्यक वस्तू, विशेषतः डाळी आणि खाद्यतेलाचा पुरवठा करा, आयकर लागू नसलेल्या सर्व कुटुंबांना दरमहा रु. ७,५०० हस्तांतरित करा, सर्व रिक्त जागा त्वरित भरा, सेना भर्ती रैलिया पूर्वरत सुरू करा, सार्वजनिक संपत्ती चे खाजगीकरण त्वरित थांबवा, जीवनावश्यक वस्तूंचे भाववाढ कमी करा, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या तरतुदीत वाढ करा, बेरोजगार भत्ता देण्यासाठी केंद्रीय कायदा करा, शहरी भागासाठी रोजगार हमी योजनेचा कायदा करा, पीक कर्जाचे वाटप करा, पूर्वीप्रमाणे कोरोना चे बूस्टर डोज सर्वाना मोफत द्या इत्यादी प्रमुख मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या.
महागाई, बेरोजगारी विरोधात डावे पक्ष मैदानात, देशव्यापी आंदोलनाचा नारा
देशभरात डाव्या पक्षांनी 25 मे पासून 31 मे पर्यंत महागाई व बेरोजगारी विरोधात देशव्यापी आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. ह्याचाच भाग म्हणून रामटेक तहसील कार्यलयासमोर हे जोरदार प्रदर्शन करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व माकपचे कॉ. मनोहर मुळे, कॉ.राजू हटवार, भीमराव गोंडाने, गौराबाई माकडे, कल्पना हटवार, भाकपचे कॉ. अरुण बनकर, कॉ. आनंद गजभिये, नत्थु परतेती, जालीम शेख यांनी केले. निदर्शनात गँगाराम खेडकर, राधेश्याम मेश्राम, भीमराव टेकाम, अनिल भुरे, कांता कोरम, सुशीला बुरे, गीता टेकाम, नेला डोमने, दसराम फुलबेल सहित इतर अनेकांनी सहभाग घेतला.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे अंतर्गत विविध पदांसाठी भरती
नवीन भरती : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, असा करू शकता अर्ज
बीड जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 12 वी ते वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी !
वायुसेना शाळा चंदन नगर, पुणे येथे विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज