Tuesday, January 21, 2025

शिक्षकांच्या कोरोना ड्युटीमध्ये माध्यमिक व ज्यूनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांचा समावेश करण्याची मागणी

कोल्हापूर : शिक्षकांच्या कोरोना ड्युटीमध्ये माध्यमिक व ज्यूनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांचा समावेश करण्याची मागणी कोल्हापूर जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 


निवेदनात म्हटले आहे की, गेले वर्षभर कोरोना प्रार्दुभावामुळे सर्व शासकीय यंत्रणा, आरोग्य विभाग हे आणीबाणीच्या काळात नागरिकांना सोयी सुविधा देण्याचे काम करीत आहे. या यंत्रणेला सहकार्य व मदतनीस म्हणून महापालिका शाळेतील प्राथमिक शिक्षक यांना मदतनीस म्हणून नियुक्त केले आहे. पण गेली वर्षभर काही ठराविक लोकांनाच हे काम दिले आहे. तसेच कामाबरोबरच त्यांचे नेहमीचे ऑनलाईन शिक्षण, धान्य वाटप, कार्यालयीन काम, सर्वेक्षण यासारखी ही कामे हे शिक्षक करीत आहेत. 

गेल्या काही महिन्यापासून याकामात माध्यमिक शिक्षकांना ही सहभागी करून घेतले आहे. सदर शिक्षक सतत कामगिरीवर हजर असल्याने त्यांना व त्यांच्या कुटूंबियांनाही कोरोनाची लागण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पण नैतिक जबाबदारी म्हणून हे लोक कोरोना कामागिरी बजावत आहेत. यामध्ये काही शिक्षक हे अखंडपणे १८५ दिवस काम करीत आहेत. त्यामुळे ठरविक लोकांनाच ही जबाबदारी म्हणजे त्यांच्यावर अन्याय आहे.

आज शहरात प्राथमिक शिक्ष  सेवकांची संख्या ( मनपा + खाजगी ) २००० च्या आसपास आहे. तितकीच संख्या माध्यमिक विभागाची व उच्च माध्यमिक विभागाची ही आहे. या सर्वांनाच हे काम रोटेशन पद्धतीने दिल्यास कोणावरही ताण येणार नाही आणि अन्याय ही होणार नाही. तसेच कामही व्यवस्थित होईल. म्हणून प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या बरोबर कोल्हापूर शहरातील सिनियर कॉलेज मधील प्राध्यापक शिक्षकांनाही कोरोना कामगिरी मध्ये सहभागी करून घेणेस काही अडचण असणेचे कारण नाही.

अशी मागणी कोल्हापूर जिल्हा नागरी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, प्रवीण पुगावकर, चंद्रकांत पाटील, लहुजी शिंदे, कादर मलबारी, रत्नाकर कोळेकर यांनी केली आहे.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles