वडवणी : गेल्या दोन वर्षात देशासह जगभरात करोनाने हाहाकार माजवला होता. यात अनेक देशांची आरोग्य व्यवस्था ढासाळली होती, याला भारत देखील अपवाद ठरलेला नव्हता. करोनाच्या या महामारीशी लढण्यासाठी अनेक कोव्हीड योध्ये आपला व आपल्या कुटूंबाचा जीव धोक्यात घालून समोर आले होते, आता कोविड कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये सामावून घेण्याची मागणी केली जात आहे.
करोनाच्या महामारीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात काम केलेल्या डॉक्टर, स्टाफ नर्स, डाटा एंट्री ऑपरेटर, फार्मसिस्ट, वार्ड बॉय, हॉस्पिटल मॅनेजर, स्टोर कीपर आदी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सामावून घेण्याची मागणी कोविड कर्मचाऱ्यांनी आयुक्त आरोग्यसेवा तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक, यांच्याकडे मंत्रालयामध्ये भेटून निवेदनद्वारे केली आहे.
उत्तर प्रदेश निवडणूक : सायकलचं बटण दाबलं की, कमळाला मत दिल्याची स्लिप, सपाचा गंभीर आरोप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद अनेक कर्मचाऱ्यांनी स्वयंसेवक म्हणून विनावेतन काम केले तर अनेकांनी कंत्राटी पद्धतीने काम केले आहे. रुग्ण संख्या कमी होताच सदर कर्मचाऱ्यांचा कोणताही विचार न करता त्यांना कामावरून कमी करण्यात आले.
विधानसभा, विधानपरिषदेत व लोकसभा व राज्यसभा येथे कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर आवाज उठवण्यासाठी व न्याय मागण्यासाठी राज्यातील सर्व मंत्र्यांची, खासदार व आमदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार आहे तसेच त्यांच्याकडून शिफारस पत्र घेणार आहोत. वेळ प्रसंगी न्याय संस्थेकडे देखील गरज पडल्यास याचिका दाखल करून न्याय मागणार आहोत.
– लहू खारगे (कोविड योद्धा)
व्हिडिओ : मुंबई- पुणे एक्सप्रेसवे वर ६ वाहनांचा भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू
काही महिन्याचे वेतन देखील प्रलंबित आहे, अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांना शासनाने येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये सेवा जेष्ठता यादी नुसार प्राधान्य देण्यात यावे तसेच अकरा महिन्यांच्या करारावर सेवाजेष्ठता यादी नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समायोजन करून घ्यावे व जोखिव भत्ता लागू करण्यात यावा अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर लहू खारगे, राजश्री जाधवर, कसबे, अक्षय सोनवणे भारतचाफा कानडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पोलीस उपनिरिक्षक होण्याची सुवर्णसंधी एमपीएससी तर्फे 250 जागा