Friday, April 19, 2024
Homeजिल्हाहोमगार्ड साठी शासनाने केलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी

होमगार्ड साठी शासनाने केलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी

परभणी / रफिक शेख : होमगार्ड साठी शासनाने केलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी परभणी होमगार्ड सदस्यांनी गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील होमगार्ड समस्या व मागण्या मागील अनेक वर्षा पासून शासन दरबारी पाठपुरावा सुरु असून दि 8 जून रोजी राज्याचे गृह राज्य मंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षते खाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक संपन्न झाली.

विविध कारणांनी अपात्र होमगार्ड ना त्वरीत विना अट कर्तव्यावर रुजू करुन घ्यावे, पोलीस खात्यातल 5 % आरक्षणा वरुण 15 % आरक्षण करण्यात यावे. तिन वर्षाची होणारी होमगार्ड ची पुर्नरनोंदणी बंद करणे. जिल्हा समादेशक / मानसेवी पद पुर्ववत ठेवावे,  आंदोलकावरील कार्यवाही त्वरीत मागे घेणे. पोलीस प्रशासनास जी आपत्ती जनक विमा रक्कम मंजुर आहे त्यास होमगार्डस चा समावेश करावा, आदी मागण्यांवर निर्णय झाल्याचेही रामलिंगपुराणे, बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष तथा समाज सेवक यांनी दिली असल्याचेही म्हटले.

निवेदनावर सुरेश काळे, परमेश्वर जवादे, गंगाधर कटारे, लिंबाजी लोंढे, सुरेश पुडंगे यांची नावे आहेत.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय