चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील 500 चौ.फुटापर्यंच्या घरांचे मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी ई-मेलद्वारे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे व्ही.जे.एन.टी. सेलचे कार्याध्यक्ष गुलामली भालदार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सुमारे 16 लाख घरांचा 500 चौरस फुटापर्यंतच्या मालमत्ता कर रद्द करण्याची घोषणा शनिवारी करून अनेक गोरगरीब कुटुंबाना आर्थिकदृष्ट्या दिलासा दिला आहे. मुंबईप्रमाणे नाशिक महापालिकेच्या घरांची मालमत्ता 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांची मालमत्ता कर रद्द करण्यासाठी महापालिकेतील सत्तारुढ भाजपाच्या वतीने हालचाली सुरू आहे.
हेही वाचा ! जालना जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ११९ जागा
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दील आज 27 लाख लोकसंख्या आहे. राज्य परराज्यातील नागरिक मोलमजूरी नोकरी निमित्ताने या शहरात भोसरी, तळवडे, रुपीनगर, काळेवाडी, सांगवी, चिंचवड, पिंपरी, कासारवाडी, दापोडी भागात अर्धागुंठा जागा घेवून येथे बांधकाम करून राहत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे मार्च 2020 सालापासून अनेकांच्या नोकर्या गेल्या शेकडो परप्रांतीय त्यांच्या राज्यात गेले. पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते, याशहरात मजूर, अर्धकुशल कामगार यांची लोकसंख्या अंदाजे 9 ते 10 लाखांच्या आसपास आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने सन 1980 सालापासून आजपर्यंत पिंपरी-भाटनगर, निगडी-ओटास्किम, चिखली-घरकुल आदी इमारती केंद्र सरकार, राज्य सरकार, पिंपरी चिंचवड महापालिका व राहणारा लाभार्थी यांच्याकडून माफक रक्कम घेवून त्यांना कायम निवार्याची सोय, हक्काची घरे दिली आहेत. यात विधवा, अपंग, अंध, माजी सैनिक, आर्थिकदृष्ट्या मागासलेले नागरीक वास्तव्यास आहेत. पूर्वी या घरात राहत असलेले नागरीक यापूर्वी झोपडपट्टी, चाळीत भाड्याच्या घरात राहत होते. त्यांचे जीवनमान व राहणीमान उंचावण्यासाठी अनेक प्रकल्प उभारले. या सर्व भागातील घरे 500 चौरस फुटापर्यंत आहेत. मुंबई महापालिका प्रमाणे यांची घरपट्टी आज अंदाजे 4 ते 6 हजारांपर्यंत दरवर्षी येते. अश्यांची घरपट्टी पिंपरी चिंचवड महापालिकेने माफ केल्यास त्यांना मोठा दिलासा मिळेल, असेही भालदार यांनी म्हटले आहे.
– क्रांतिकुमार कडुलकर