Delhi : दिल्लीतील नरेला भागात एक खळबळजनक घटना घडली आहे. घरगुती वादातून एका काकाने आपल्या ४ वर्षांच्या भाचीचे अपहरण करून निर्घृण हत्या केली. या घटनेने संपूर्ण शहर हादरले असून, शहरात संतापाची लाट उसळली आहे. मुलीचा मृतदेह एका जंगलात आढळून आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार पासून मुलगी घरातून बेपत्ता होती. त्यामुळे वडिलांनी तिचा शोध सुरु केला. आसपासच्या परिसरात मुलीचा शोध घेतला. घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर मुलीचा मृतदेह सोमवारी घराजवळील जंगल परिसरात आढळून आला.पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत आरोपी काकाला सीतापूर येथून अटक केली.
प्राथमिक तपासात असे समोर आले की, मृत मुलीच्या आईसोबत घरगुती वादातून राग धरून काकाने तिच्या मुलीची हत्या केली. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी पथक नेमले. आरोपीला अटक केले असून,आरोपीवर पोलिसांनी १०३, २३८ कलम अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आणि पोलिस पुढील तपास करत आहेत.
Delhi
हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
धक्कादायक : बेंगळुरूमध्ये महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे फ्रिजमध्ये आढळले
गुजरातच्या रिया सिंघाने जिंकला मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा ताज
जगातील सर्वात जास्त मागणी असलेला महागडा ट्यूना मासा
पुणे महापालिकेचा टेम्पो खड्ड्यात कोसळला; पहा थरारक व्हिडिओ
उत्तर प्रदेशात भरधाव बस पलटी; 44 प्रवासी जखमी, एका व्यक्तीचा मृत्यू, पहा व्हिडीओ