नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर लग्नसोहळ्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात, तर काही आश्चर्यचकित करणारे. असाच एक अनोखा प्रकार दिल्लीतील एका लग्नात घडला. नवरदेवाने ‘चोली के पिछे’ (Choli Ke Pichhe)गाण्यावर डान्स अन् थेट त्याचे लग्न मोडले.
नेमकी घटना काय घडली? (Choli Ke Pichhe)
लग्नात नवरदेव जेव्हा लग्नाच्या ठिकाणी पोहोचत होता, तेव्हा मिरवणुकीत ‘चोली के पिछे क्या है’ या गाण्यावर त्याने तुफान डान्स केला. मित्रांनी त्याला पुन्हा-पुन्हा डान्स करण्याचा आग्रह केला आणि नवरदेव आपल्या मित्रांसोबत ‘चोली के पिछे क्या है’ या गाण्यावर जोरदार नाचत होता. मात्र, हे पाहून वधूपक्ष नाराज झाला आणि सासऱ्यांनी थेट लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.
सासऱ्यांना वाटले की, हा डान्स त्यांच्या संस्कृतीला शोभणारा नाही. तुरळक पाहुण्यांनीही नाराजी व्यक्त केली. अखेर, नवरदेवाचा हा उत्साही डान्स त्याच्या लग्नाच्या आड आला.
‘चोली के पिछे’ गाणे पुन्हा चर्चेत
‘खलनायक’ (Khalnayak) चित्रपटातील हे गाजलेले गाणे वादग्रस्त राहिले आहे. माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्या अभिनयाने हे गाणे अधिक लोकप्रिय झाले होते. अलका याज्ञिक आणि इला अरुण यांनी गायलेल्या या गाण्यावर अनेक वर्षांपासून वाद आहे.


हे ही वाचा :
शेतकऱ्यांसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ; जाणून घ्या 10 महत्त्वाच्या घोषणा
इंडिया पोस्टबाबत निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा
ब्रेकिंग : थोड्याच वेळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार देशाचा अर्थसंकल्प
पुणे हादरलं | आईचे अनैतिक संबंध ; अल्पवयीन मुलाकडून तरूणाची हत्या
धक्कादायक : पालकांनी मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून 13 वर्षीय मुलाची आत्महत्या
क्रिकेट खेळण्यावरून वाद ; स्टंपने मारहाण, १३ वर्षीय मुलाचा मृत्यू