Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मूर्ती व निर्माल्य संकलनाकरीता फुलांनी सजवलेले सुशोभिकरण रथ उपलब्ध करून देणार – आयुक्त शेखर सिंह

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महानगरपालिकेने केले आवाहन

---Advertisement---

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : नागरिकांनी शक्यतो घरी विसर्जन करण्यास व मूर्तीदान करण्यास प्राधान्य द्यावे. गणेश मंडळांनी गणेश मूर्तींचे विधीवत विसर्जन मंडपालगत ( कृत्रिम हौदामध्ये) करण्यास प्राधान्य द्यावे. गणेश विसर्जन दिवशी (दिड दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस व दहा दिवस) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांमार्फत मूर्ती व निर्माल्य संकलनाकरीता फुलांनी सजवलेले सुशोभिकरण रथ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये मूर्ती संकलन केंद्र उपलब्ध असणार आहेत तसेच त्या मूर्ती विसर्जन करण्याकरीता नेण्यासाठी वाहने उपलब्ध असणार आहेत. श्रींच्या विसर्जनाकरीता प्रत्येकी २ कन्वेअर बेल्ट एका विसर्जन ठिकाणांवर उपलब्ध असतील. आवश्यकता असल्यास अधिकचे कन्वेअर बेल्ट उपलब्ध करून देण्यात येतील. प्रत्येक प्रभागातील सुशोभित रथाच्या मूर्ती संकलनासाठी Route Chart (मार्ग क्रमणिका) प्रसिध्द करण्यात येणार असून त्यानुसार नागरिकांनी व मंडळांनी गणेशमूर्तीं दान कराव्यात तसेच निर्माल्य स्विकारण्यासाठी ठेवण्यात आलेल्या वाहनात निर्माल्य द्यावे. महानगरपालिकेद्वारे संकलित केलेल्या गणेशमूर्तींचे विधीवत रित्या व पावित्र्य राखून विसर्जन करण्यात येईल, अशा सूचना पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह व पिंपरी चिंचवड शहरचे पोलीस आयुक्तसो विनयकुमार चौबे यांनी दिल्या.

---Advertisement---

नागरिकांना पुढीलप्रमाणे पोलीस मदतीसाठी महत्वाचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

नियंत्रण कक्ष, पिंपरी चिंचवड 020-27352500 / 600 / 27450888 / 26209122, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड 020-27350555, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड 020-27350444, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, पिंपरी चिंचवड 020-27350120, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ 020-27445456, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२ 020-27445345, वाहतुक नियंत्रण कक्ष, पिंपरी चिंचवड 020-27610015 / 27610016, विशेष शाखा 020-27350937 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकाद्वारे मदतीसाठी क्षेत्रीय कार्यालये / क्षेत्रीय अधिकारी यांचे संपर्क क्रमांक :

अ क्षेत्रीय कार्यालय – श्रीमती सूचिता पानसरे 020-68334000 / 9028887631, ब क्षेत्रीय कार्यालय – अमित पंडित 020-68334300 / 9890019232, क क्षेत्रीय कार्यालय – अण्णा बोदडे 020 68334500 / 9922501942, ड क्षेत्रीय कार्यालय – किरणकुमार मोरे 020-68334700 / 9922501459, इ क्षेत्रीय कार्यालय – राजेश आगळे 020-68335000 / 9552511972, फ क्षेत्रीय कार्यालय – सिताराम बहुरे 020-68335300 / 9923989774, ग क्षेत्रीय कार्यालय – श्रीमती शीतल वाकडे 020-68335500 / 9422320697, ह क्षेत्रीय कार्यालय – उमेश ढाकणे 020-68335700 / 8830829091, सुरक्षा विभाग – उदय जरांडे 020-67331512 / 9552790101, अग्निशामक विभाग – विजयकुमार थोरात 020-27422405 / 9766597009, पर्यावरण विभाग – संजय कुलकर्णी 020-67331342 / 9922501739, आपत्ती व्यवस्थापन विभाग – ओमप्रकाश बहिलवाल 020-67331111 / 7276771077, विद्युत विभाग बाबासाहेब गलबले 020-68331420 / 9922501734, सारथी 8888 00 6666, स्मार्ट सारथी 020-67331110

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles