Sunday, December 8, 2024
Homeताज्या बातम्याDeath of animals : गोशाळेत चारा पाण्याविना ३० जनावरांचा मृत्यू

Death of animals : गोशाळेत चारा पाण्याविना ३० जनावरांचा मृत्यू

Bhandara : भंडारा जिल्ह्यातील पवनीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पवनी येथील गोशाळेत चारा पाण्याविना तब्बल ३० जनावरांचा मृत्यू (Death of animals) झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता पवनी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. Bhandara Death of animals

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीतील कुरखेडा पोलिसांनी कत्तलखान्यात नेणाऱ्या जनावरांना ताब्यात घेतले होते, तसेच या जनावरांना धानोरीतील बळीराम गौशाळेत दोन दिवसांपूर्वी पाठवलं होते. मात्र, बळीराम गोशाळेत चारा आणि पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळं या गौशाळेतील 30 जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

जनावरांना गौशाळेत ठेवण्यासाठी शेड, पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करणे गरजेचे असताना, ही सर्व जनावरे उघड्यावर ठेवण्यात आली होती. याप्रकरणी पवनी पोलिसांनी गौशाळेच्या एका संचालकाला ताब्यात घेतलं आहे. कत्तलखान्यात नेणाऱ्या जनावरांची सुटका करुन जनावरांना गौशाळेत पाठविण्यात आले. मात्र त्याचा चारा पाण्याविना मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे.

दरम्यान, मागील वर्षी या गौशाळेच्या अध्यक्षांसह 13 संचालकांवर गौशाळेतील जनावरे विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती. यावेळी देखील गौशाळेच्या कारभारावर जोरजाक टिका ही झाली होती.

हे ही वाचा :

ब्रेकिंग : सीएनजीच्या दरात मोठी कपात, सर्वसामान्यांना दिलासादायक

सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले.

ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांविरूद्ध १८६५ तक्रारी प्राप्त; ७३९ परवाने निलंबित, वाचा काय प्रकरण

Facebook, Instagram down : फेसबुक, इंस्टाग्राम डाऊन; वापरकर्ते हैरान

सर्वात मोठी भरती : राज्यात 17 हजार पोलिस भरती प्रक्रिया आजपासून सुरू

शेतकऱ्यांनी सरकारकडे काही मागायचे नाही, तर… नाना पाटेकर यांचे मोठे विधान

मंडळ कृषी अधिकारी संवर्गातील १२१ उमेदवारांना नियुक्त्या प्रदान

संबंधित लेख

लोकप्रिय