Thursday, February 6, 2025

प्रिय अण्णा… ‘पेट्रोल डिझेलच्या किंमती आणि महागाईसाठी नव्हें’ तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हा मेसेज

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. केंद्रात काँग्रेस सत्तेत असताना अण्णा हजारे यांनी केलेली आंदोलने, उपोषणे फार गाजली, परिणामी त्याचा काँग्रेस सरकारला मोठा धक्का बसला होता आणि नंतरच्या काळात काँग्रेसला सत्ता देखील गमवावी लागली.

केंद्रात सत्ता पालट होऊन भाजप सत्तेत आल्यानंतर भाजपच्या कार्यकाळात वाढलेल्या महागाई वेळी अण्णा हजारे यांची भूमिका बदलली का? असा प्रश्न आणि विविध टीका देखील त्यांच्या वर सातत्याने केल्या जात असतात.

 

 

अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत टोला लगावला आहे. आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे की, प्रिय अण्णा…. प्रचंड महागाई ,पेट्रोल-गॅस-डिझेल-खाद्यतेल यांचे गगनाला भिडलेले भाव, ढासळती अर्थव्यवस्था, कोरोनामुळे कोलमडलेली आरोग्यव्यवस्था, वाढती सामाजिक दरी, चीन सोबत सीमेवरील तणाव ह्यांच्या बद्दल नाही तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हा मेसेज होता #HappyBirthdayAnna असे म्हटले आहे.

 

Related Articles

- Advertisement -

Latest Articles