Swargate Bus Rape Case : स्वारगेट बसस्थानक परिसरात शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय रामदास गाडे यास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी मध्यरात्री शिरुर तालुक्यातील एका गावातून अटक केली. आरोपीला पकडण्यासाठी तब्बल 70 तासांचा शोध मोहीम राबवण्यात आली.
गावकऱ्यांच्या मदतीने ऊसाच्या शेतातून सापळा रचून अटक
दत्तात्रय गाडे हा घटनेनंतर फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी विशेष पथके तैनात केली होती. आरोपीस पकडण्यासाठी 100 हून अधिक पोलिसांचे 13 पथकं गावकऱ्यांच्या मदतीने ऊसाच्या शेतात उतरली होती. तसेच ड्रोन आणि स्निफर डॉगचा वापर करून त्याला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय, आरोपीबाबत माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
स्वारगेट बसस्थानक परिसरात घडली घटना (Swargate rape case)
26 वर्षीय पीडित तरूणी पुण्यात नोकरीला असून, ती फलटण येथे जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानकात पोहोचली होती. बस शोधत असताना आरोपी दत्तात्रय गाडेने तिची दिशाभूल करून अंधाऱ्या जागी उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेने तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू
शिवशाही बस बलात्कार प्रकरणामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी वेगवान कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. सध्या त्याच्यावर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, अधिक तपास गुन्हे शाखा करत आहे.
या घटनेतील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय 36 वर्षे) याची गुन्हेगारी पार्श्वभुमी असून तो पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवासी आहे. आरोपी दत्तात्रेय गाडे याच्यावर याआधीच चोरी, दरोडे आणि चेन स्नॅचिंगसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. २०१९ साली तो एका दरोड्याच्या गुन्ह्यात जामिनावर सुटला होता.

हे ही वाचा :
इन्फोसिस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; लवकरच होणार पगारवाढ
संतापजनक : स्वारगेट बस डेपोत २६ वर्षीय तरूणीवर बलात्काराची घटना, डेपोतील धक्कादायक गोष्टी समोर
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा
बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, अनेक वस्तू जप्त, १३ जण अटकेत
LIC ची स्मार्ट पेन्शन योजना ; एकदाच गुंतवणूक करा आणि आजीवन पेन्शन मिळवा!