Thursday, July 18, 2024
Homeजिल्हा९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आदिवासी संस्कृतीचे घडविले दर्शन

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आदिवासी संस्कृतीचे घडविले दर्शन

नाशिक / सुशिल कुवर : दि. ०३, ०४ आणि ५ डिसेंबर २०२१ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातलेला आहे. त्यातच आदिवासी संस्कृती दर्शन स्टॉलचे उद्घाटन आदिवासी विकास विभाग नाशिकचे आयुक्त सोनवणे, अप्पर आयुक्त गोलाईत, आदिवासी प्रकल्प कळवणचे आयुक्त मीना यांनी केले.

पहिल्याच दिवशी आदिवासी प्रकल्प कळवण अंतर्गत आदिवासी संस्कृती दर्शन सर्व समाज बांधवाना पर्यंत पोहचावे म्हणून योगिताताई लक्ष्मण पवार, रुपालीताई गोकुळ चव्हाण, जयश लक्ष्मण पवार, किरण रंगनाथ साबळे यांनी उत्तम अशी स्टालमध्ये टेबलांनवर धन- धान्य, आदिवासी दैवत – वाघदेव, नागदेव, मोरदेव, चंद्रदेव, सूर्यदेव, कणसरा माता, देवमोगरा माता, पारंपारिक वाद्य – सांबळ, ढाका, खुट्याची काठी, पावरी, पावा, आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिम, आदिवासी गडी, आदिवासीचे शिकारीची साधने, आदिवासीचे पारंपारिक साधने – बैलगाडी, चूल, मुसळ, घरटी, उखळ, विळा,गलुल, सोकडी, धनु कांड, डालखी, सुपडा, आदिवासी खाद्य संस्कृती तसेच आदिवासी साहित्यिक पुस्तकाची मांडणी करून संमेलनामध्ये आदिवासी अस्तित्व, अस्मिता, संस्कृती टिकवण्याचे काम केले जात आहे. 

कवी रमेश भोये व योगिताताई पवार यांनी आदिवासी पारंपारिक साधने, आदिवासी घडी, आदिवासी संस्कृती, आदिवासी भाषा, आदिवासी झेंडा, आदिवासी साहित्यिक आणि आदिवासींचे निसर्गाशी अतुट नाते कसे आहे. या संबधीत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा अधिकारी सुरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त सोनवणे, कळवण प्रकल्पचे आयुक्त मीना तसेच आलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना माहिती दिली.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय