Wednesday, February 12, 2025

दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?

Dana Cyclone : देशाच्या पूर्व किनारपट्टीला धडकणारे ‘दाना’ चक्रीवादळ सध्या हवामान खात्याच्या सततच्या देखरेखीखाली आहे. भारतीय तटरक्षक दलाने देखील यासाठी 56 पथकं हाय अलर्टवर ठेवली आहेत. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात देखील दिसून येत असून, राज्यातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

हवामान विभागाने पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा इशारा दिला आहे. कोकणातील रत्नागिरी, पालघर, रायगड, ठाणे या जिल्ह्यांसह मुंबई शहर आणि उपनगरांत पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना या पावसामुळे अडचणी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, कारण शेतातील पिकं कापणीसाठी तयार आहेत. विशेषतः गहू पेरणीच्या प्रक्रियेत विलंब होण्याचा अंदाज आहे.

ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर ‘दाना’ चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार, लँडफॉलच्या वेळी वाऱ्याचा वेग 100 ते 120 किमी प्रति तास असेल, ज्यामुळे किनारपट्टी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. त्यामुळे त्या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्यानंतर राज्यात गुलाबी थंडीचा प्रवेश होणार आहे. सातारा, सांगली आणि विदर्भातील काही भागांमध्ये पुढील तीन ते चार दिवसांत गुलाबी थंडी जाणवणार आहे, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

या चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरणात चढ-उतार होणार असले तरी नागरिकांनीही हवामानातील बदल लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी घ्यावी, अशी सूचना हवामान खात्याने केली आहे. चक्रीवादळाचा फटका कमी प्रमाणात असला तरी पाऊस आणि वाऱ्यामुळे काही भागांमध्ये शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते.

Dana Cyclone

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू

विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गट सज्ज ; 8 दिग्गज नेत्यांना दिले एबी फॉर्म

इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?

अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?

मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात

शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित

लॉरेन्स बिश्नोई महाराष्ट्रातून विधानसभा निवडणूक लढवणार? ‘या’ पक्षाकडून मिळाली ऑफर

सूरज चव्हाणचा पहिलाच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, कोर्टात जाण्याची शक्यता!

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, दहावीच्या परीक्षेत मोठा बदल

पुण्यात बड्या नेत्याच्या कारमधून 5 कोटींचं घबाड जप्त

भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती

ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles