मामौझू : मायोट्टे हा हिंदी महासागरामधील व आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळील फ्रान्स सरकारच्या अंकित असलेल्या मायोट्टे बेटावर चक्रीवादळ चिडो ने धुमाकूळ घातला. शनिवारी हे वादळ या बेटावर धडकले. फ्रेंच हवामान सेवा नुसार, चिडो चक्रीवादळाचा वेग 220 किमी/तास पेक्षा जास्त होता. (Cyclone Chido)
मायोट्टेतील शेकडो घरे, इमारती, कार्यालये यामध्ये उद्ध्वस्त झाली. संपूर्ण बेटावरील वीज पुरवठा यंत्रणा ठप्प होऊन लोकांचे हाल झाले. मायोट्टे या बेटाची एकूण लोकसंख्या सुमारे 300,000 आहे, मायोट्टे मोझाम्बिकपासून 800 किलोमीटर दूर आहे.
मायोट्टेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांने या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याची माहिती दिली. तसेच या वादळात दोन व्यक्ती मृत झाल्याचे सांगितले. असोसिएटेड प्रेस (AP) च्या वृत्तानुसार ” 1934 नंतरचे सर्वात विध्वंसक वादळाचा सामना येथील लोकांना सहन करावा लागला आहे, अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे आणि पावसाने रस्ते उद्ध्वस्त झाले, त्यामुळे मदत कार्य करताना प्रशासनास अडचणी येत आहेत. (Cyclone Chido)
फ्रान्स सरकारने सांगितले की 1,600 पोलिस आणि अधिकारी लोकांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आले आहेत.