Tuesday, June 10, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Cyber crime : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘म्युल’ अकाउंट प्रकरणी दोघांना अटक केली.

पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाने एका ४७ वर्षीय पुणेकराला डिजिटल अटक दाखवून तब्बल ५३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या प्रकरणात अहिल्यानगर जिल्ह्यातून दोन जणांना अटक केली आहे (Cyber crime)

Cyber crime – पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या या दोघांनी — एक शेतकरी आणि दुसरा एका फायनान्स कंपनीत काम करणारा — स्वतःच्या बँक खात्यांचा “म्युल अकाउंट” म्हणून वापर करू दिला. फसवणुकीतून मिळालेले पैसे या खात्यांमध्ये वर्ग केले जात आणि ही रक्कम काढून ते स्वतःच्या ‘हँडलर’कडे सुपूर्त करीत, असा पोलिसांचा दावा आहे. (Cyber crime)

पोलिस उपनिरीक्षक प्रविण स्वामी (सायबर पोलिस, पिंपरी-चिंचवड) यांनी सांगितले, “त्यांचा हँडलर देखील त्याच गावचा असून, सध्या पुण्यात वास्तव्यास आहे. या हँडलरने गावात किमान २० म्युल अकाउंट्स उघडली होती आणि त्यांची माहिती महाराष्ट्राबाहेरील फसवणूक करणाऱ्यांना दिली होती.”

सोमवारी अटक करण्यात आलेले दोघे आकाश पथारे (२८) आणि अविनाश तुंगर (२७) हे बोल्हेगाव (अहिल्यनगर जिल्हा) येथील आहेत. (Cyber crime)

ही कारवाई मोशी येथील एका रहिवाशाच्या तक्रारीवरून करण्यात आली आहे. या व्यक्तीने २ एप्रिल रोजी एका मेसेजिंग अ‍ॅपवरून एक “पत्र” प्राप्त केल्याचे पोलिसांना सांगितले. त्या पत्रात असे नमूद होते की त्याच्या बँक खात्याचा वापर मनी लॉन्डरिंगसाठी होत आहे आणि त्याला अटक होऊ शकते. (Cyber crime)

पोलिसांच्या माहितीनुसार, “समोरच्या व्यक्तीने स्वतःला मुंबई क्राईम ब्रँचचा अधिकारी म्हणून ओळख दिली. त्याने सांगितले की, पोलिस आणि बँक तुमच्या खात्याची पैशांच्या व्यवहाराद्वारे पडताळणी करणार आहेत. पडताळणी झाल्यानंतर लगेचच पैसे परत मिळतील असे सांगण्यात आले. या थापांवर विश्वास ठेवून मोशी येथील नागरिकाने ५३ लाख रुपये तीन बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. मात्र, पैसे परत मिळाले नाहीत.

पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक रवि किरण नाळे यांनी सांगितले की, “चौकशीत आम्हाला आढळले की, ५.४ लाख रुपये एका खाजगी बँकेच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले होते. बँकेकडून संबंधित खात्याची माहिती घेतली असता ते खाते अहिल्यानगर जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आम्ही पथारेला अटक केली. त्याने आणखी तीन जणांची नावे उघड केली. त्यानंतर तुंगरला अटक केली. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. (Cyber crime)

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles