Friday, March 29, 2024
Homeग्रामीणचांदवडमध्ये लसीकरणाला उसळली गर्दी, सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे डॉ. सुशीलकुमार शिंदे यांचे आवाहन

चांदवडमध्ये लसीकरणाला उसळली गर्दी, सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे डॉ. सुशीलकुमार शिंदे यांचे आवाहन

चांदवड (सुनिलआण्णा सोनावणे) : आज उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे लसीकरणाला सुरुवात झाली. तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र वडनेर, उपकेंद्र निबाळे, धोडबे, देवरगाव या ठिकाणी कोविशिल्ड (covishield) लस देण्यात येत आहे. तालुक्यात प्रत्येक ठिकाणी स्पॉट रेजिस्ट्रेशन असल्याने प्रथम आलेल्या व्यक्तींना लसीकरण केले जात आहे.

प्रथम लस घेण्यापूर्वी युवकांनी अँटीजेन टेस्ट करण्याची गरज असल्याने तेथेही युवकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. लस घेण्याचे महत्व आता ग्रामीण भागात समजल्याने ग्रामीण भागातून सुद्धा लसीकरण करण्यासाठी उस्फुर्तरित्या महिला, पुरुष व यूवक, युवती लसीकरण करण्यासाठी येत आहेत.

दरम्यान, चांदवड येथे लसीकरणासाठी खूपच गर्दी झाल्याने डॉ. सुशील कुमार शिंदे व अनिल गायकवाड यांनी गर्दी न करता सर्वांनी सोशल डिस्टंसिंग पाळून व मास्क लावण्याचे आवाहन केले.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय