Monday, July 15, 2024
Homeक्रीडाविश्वऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स याचे निधन झाले आहे. शनिवारी रात्री अपघातात सायमंड्सचा मृत्यू झाला. त्याच्या निधनामुळे क्रिकेट विश्वासह चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. 

स्थानिक माध्यमांनुसार, टाऊन्सविले येथे शनिवारी रात्री १०.३० वाजता सायमंड्सच्या कारचा अपघात झाला. त्यावेळी अँड्र्यू सायमंड्स स्वतः कार चालवत होता. वेग जास्त असल्याने कार रस्त्यावर पलटी झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अपघातानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले.

ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्टने 46 वर्षीय अँड्र्यू सायमंड्स याच्या निधनाबद्दल ट्विटद्वारे दुःख व्यक्त केले आहे. अँड्र्यू सायमंड्सपूर्वी ऑस्ट्रेलियाचे रॉड मार्श आणि शेन वॉर्न यांचा या वर्षाच्या सुरुवातीला मृत्यू झाला होता.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय