नवी दिल्ली:चीन मधील कोरोना रुग्णसंख्या व मृत्यू दर वाढल्याचा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तातडीची कोरोना आढावा बैठक घेतली.या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया तसेच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांची व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
केंद्र सरकारने सर्व राज्ये व केंद्रशाशीत प्रदेशातील विमानतळ प्रवाशांच्या तपासणी करण्याचे निर्देश दिले.
सर्व राज्यांनी कोविड-19 संक्रमितांचे नमुने अनुक्रमासाठी INSACOG जीनोम सिक्वेन्सिंग लॅब (IGSL) कडे पाठवावेत, जेणेकरून नवीन व्हेरिएंट येतील. आरोग्य मंत्रालयाच्या या सूचनेनुसार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश हाय अलर्ट मोडमध्ये आले आहेत.
राज्य सरकारांनी ऑक्सिजन सिलिंडर,आॅक्सीजन प्लांट, व्हेंटिलेटर आणि पायाभूत सुविधांची तयारी सुनिश्चित करण्यासाठी ऑडिट तपासणी करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत.
विमानतळावर दक्षता सुरू झाली
पुणे विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग सुरू,कोरोना नियमांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.कोल्हापूर विमानतळ प्रशासन तपासणी सुरू करत असल्याचे समजते.
COVID 19 बैठक-आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करा! रुग्णालये सज्ज ठेवा,केंद्र सरकारचा राज्यांना सतर्कतेचा निर्देश
- Advertisement -