पिंपरी चिंचवड : भाजपाच्या भ्रष्ट कारभाराला पिंपरी चिंचवड शहरातील जनता वैतागली आहे. त्याचा रोष आज सगळीकडे व्यक्त होत आहे. सगळ्या गोष्टीत भ्रष्टाचार करणाऱ्या महापालिका सत्ताधाऱ्यांनी गरिबांच्या खिशावर डल्ला मारला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत सत्ताधारी भाजपाला उलथवून टाकू असे आवाहन माजी आमदार विलास लांडे यांनी केले.
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवत एकहाती सत्ता आणणार असल्याचे प्रतिपादन लांडे यांनी केले. चिंचवड स्टेशन ते महापालिका भवनापर्यंत काढलेल्या या मोर्चात हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी सामील झाले होते.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा मोदी सरकारवर हल्ला बोल !
नवनियुक्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे,माजी आमदार विलास लांडे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, प्रवक्ते व निवडणूक प्रभारी योगेश बहल, मंगला कदम, सुलक्षणा धर, नाना काटे, मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडवे, वैशाली काळभोर, जगदिश शेट्टी, राहुल भोसले, प्रशांत शितोळे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, यश साने, जालिंदर शिंदे, विकास साने, संदीप पवार, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विराज लांडे आदी उपस्थित होते.
– क्रांतिकुमार कडुलकर
ब्रेकिंग : २००८ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी ७८ पैकी ३८ जणांना फाशी, तर ११ जणांना जन्मठेप
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध पदांच्या एकूण १५३ जागा!
ब्रेकिंग : राज्यात पुन्हा बर्ड फ्ल्यूमुळे खळबळ, ३०० कोंबड्या दगावल्या
RBI मध्ये 950 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा!