(प्रतिनिधी) :- जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेत नाही. अनेक देशांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ताळेबंदची घोषणा केली होती, परंतु अनेक देशांनी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसतानाच देशातील उद्योगधंद्यांना सुरुवात करण्यास परवानगी दिली, त्याला भारत सुद्धा अपवाद नाही. टाळेबंदच्या सुटी मुळे देशातील आणि जगातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली.
अशातच भारतासाठी एक धक्कादायक बाब समोर आली आहे की, कोरोनाच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. सध्या एकूण जगामध्ये १ कोटी १५ लाख ६३ हजार ००४ रुग्ण आहेत. त्यातील ६५ लाख ३८ हजार ८६८ इतके लोक बरे झाले आहेत. तर जगात ५ लाख ३६ हजार ८४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या क्रमांकावर युनायटेड स्टेट अमेरिका असून तिथे कोरोनाबाधितांची संख्या २९ लाख ८२ हजार ९२८ इतकी आहे. त्यातील १२ लाख ८९ हजार ५६८ इतके लोक बरे झाले आहेत. तर १ लाख ३२ हजार ५६९ लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील असून तिथे १६ लाख ०४ हजार ५८५ इतके कोरोना बाधित आहेत. त्यातील ९ लाख ७८ हजार ६१५ इतके लोक बरे झाले आहेत. तर ६४ हजार ९०० मृत्यू झाले आहेत.
तर भारताने रशियाला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर गेला असून भारतात ६ लाख ९७ हजार ८३६ इतके कोरोना बाधित आहेत, त्यातील ४ लाख २४ हजार ९२८ इतके लोक बरे झाले आहेत. तर १९ हजार ७०० लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.