Friday, December 6, 2024
Homeआरोग्यकोरोनाआंबेगावच्या आदिवासी भागातील २५ गावांमध्ये कोरोना विषयी जाणीव जागृती मोहीम संपन्न

आंबेगावच्या आदिवासी भागातील २५ गावांमध्ये कोरोना विषयी जाणीव जागृती मोहीम संपन्न

घोडेगाव : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शासकीय नियम पाळावे, गर्दी टाळावी व सर्वानी लसीकरण करावे यासाठी लोकांना आवाहन करणारी जाणीव जागृती उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सुमारे २५ पेक्षा अधिक गावात जाऊन लोकांना माईक द्वारे व घरोघरी माहितीचे पत्रक वाटप करून यावेळी नागरिकांमध्ये जाणीव जागृती रोटरी क्लब मेट्रो, पुणे यांच्या सहकार्याने व शहीद राजगुरु ग्रंथालय, फलोदे आणि आदीम संस्था, आंबेगाव यांच्या स्थानिक संयोजनातून ही जाणीव जागृती करण्यात आली होती.

गर्दी टाळा, मास्क वापरा व शारीरिक अंतर राखा या सूचना लोकांपर्यंत पोहचवितानाच लसीकरण टाळू नका हा संदेश ही यावेळी देण्यात आला. तसेच लसीकरण विषयीचे मनातील गैरसमज काढून टाकून ४५ वर्षापुढील सर्वानी लसीकरण अवश्य करा, अशी माहिती ही यावेळी देण्यात आली.

कॉम्पिटेटर फौंडेशन, रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट व आदीम संस्था यांच्या सहयोगातून उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातुन ही जाणीवजागृती करण्यात आली. या जाणीवजागृती कार्यक्रमाचे उदघाटन घोडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक लहू शिंगाडे यांनी केले.

या जाणीवजागृती मोहिमेला, मार्गदर्शन व सहकार्य उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, साहाय्यक पोलीस निरीक्षक घोडेगाव प्रदीप पवार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी केले होते.

यावेळी आदीम संस्थेचे व शहीद राजगुरु ग्रंथालयाचे कार्यकर्ते अनिल सुपे, समीर गारे, अर्चना गवारी, अविनाश गवारी, ऋतुजा असवले व लहू गिरंगे सहभागी झाले होते.

संबंधित लेख

लोकप्रिय