Friday, December 6, 2024
Homeग्रामीणकोपरे - मांडवे भागात हिरड्यांचे मोठे नुकसान !

कोपरे – मांडवे भागात हिरड्यांचे मोठे नुकसान !

कोपरे (जुन्नर) : आदिवासी भागात गेली चार वर्षापासून आदिवासी विकास महामंडळ मार्फत हिरडा खरेदी केंद्र बंद करण्यात आली आहेत. तर वादळ नुकसान झालेल्या शेतकऱ्याना शासन नुकसान भरपाई देत नाही. हिरड्यांचे करायचे काय ? असा प्रश्न उभा राहिला आहे.

जुन्नर उत्तेकडील कोपरे, जांभूळशी, या भागात मे महिन्यात हिरडा वेचण्याचा हंगाम चालू असताना वादळ झटका दिला. हिरडा ओला झाल्यामुळे त्याला बुरशी आली आहे, तर वाऱ्याने झाडावरील हिरडा खाली पडला. मागील वर्षी चक्रीवादळ झाले तेव्हा पंचनामे करण्यात आले. मात्र, हिरडा समावेश फळ यादीत समाविष्ट नसल्याने मदत देण्यात आली नाही, असेही ग्रामस्थांनी सांगितले.

कोरोनामुळे हाताला रोजगार नाही. तर व्यापारी कवडी मोल किमतीने हिरडा खरेदी करतात. आर्थिक विवचंनेत सापडलेल्या शेतकऱ्याला नाइलाजाने हिरडा विकावा लागतो. गेल्या वर्षी २२० रू किलो बाजार भाव यंदा मात्र १५० रू आहे. 

हिरडा झाडाची सातबाऱ्यावर नोंद नसल्याने आज पर्यंत शासन कडून नुकसान भरपाई देण्यात येत नाही. गेल्या वर्षी चक्रीवादळ सावरत असताना पुन्हा वादळ झटका दिला. आदिवासी शेतकरी बांधव यांना सरसकट अनुदान देण्यात यावे.

– संजय माळी, शेतकरी (कोपरे)

हिरडा झाडाची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी किसान सभा शासनाकडे पाठपुरावा करत आहे. गेल्या आणि या वर्षीही हिरड्याचे नुकसान झाले आहे. शासनाने हिरड्याचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे.

– लक्ष्मण जोशी, तालुका सचिव

अखिल भारतीय किसान सभा

आदिवासी विकास महामंडळ मार्फत नाचणी, सावा, भात, वराई सेवा केंद्र बंद असल्याने आदिवासी शेतकरी याचे अतोनात नुकसान सहन करावे लागत आहे. आदिवासी विकास महामंडळ यांनी हिरडा व इतर सर्वच खरेदी केंद्र चालू करून या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय