Sunday, March 16, 2025

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे गांधीजींच्या हत्ये संदर्भात वादग्रस्त वक्तव्य

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now
Photo : Nana Patole / Facebook

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादग्रस्त विधान करून चर्चेत राहणारे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. गांधीजींच्या बद्दल बोलताना त्यांनी “वध” असा शब्द वापरला आहे, त्यामुळे आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने एका कार्यक्रमात बोलताना नाना पटोले यांची जीभ  घसरली. महात्मा गांधी यांच्या बद्दल बोलताना पटोले यांनी गांधीजींच्या हत्येच्या संदर्भात “वध” असा उल्लेख केेला आहे, वध हा शब्द वाईट व्यक्तीच्या किंवा राक्षस, असुर प्रवृत्तीच्या माणसाच्या हत्येसाठी वापरला जातो. तो शब्द गांधीजींच्या बाबत नथुराम गोडसेचे समर्थक वापरताना दिसतात. आता या वरून पटोले यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. भाजपने देखील पटोले यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

नाना पटोले आपल्या भाषणात बोलताना म्हणाले कि, “अहिंसेचा मार्ग स्विकारून महात्मा गांधीजींनी भारताला तर स्वातंत्र्य दिलंच जगालाही संदेश देण्याचे काम अहिंसेच्या माध्यमातून महात्मा गांधीजींनी केलेलं आहे, आजच्या दिवशीच पहिला आतंकवादी या देशामध्ये महात्मा गांधीजींची हत्याराच्या रूपामध्ये नथुराम गोडसे हा पुढे आला आणि आजच्या दिवशी महात्मा गांधीजींचा वध नथुराम गोडसेने केला.” 

दरम्यान, नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं बद्दल अनेक वादग्रस्त विधान केले होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles