पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)च्या वतीने शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून २६/११ हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहून सामूहिक संविधान प्रस्तावना वाचन शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय खराळवाडी पिंपरी येथे सकाळी ११:३० वाजता करण्यात आले. संविधान व प्रस्तावना वाचन संजय औसरमल अध्यक्ष राष्ट्रवादी सामजिक न्याय विभाग यांनी केले.
यावेळी महिला अध्यक्ष कविता आल्हाट, पक्षप्रवक्ते विनायक रणसुभे, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, माजी नगरसेवक गोरक्ष लोखंडे, ज्ञानेश्वर कांबळे, अर्बन सेल अध्यक्ष दत्तात्रय जगताप, महिला कार्याध्यक्ष कविता खराडे, पर्यावरण सेल अध्यक्ष विनय शिंदे, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, व्यापारी सेल अध्यक्ष विजय पिरंगुटे, ख्रिश्चन सेल अध्यक्ष पूर्णचंद्र स्वाईन, सरचिटणीस किरण नवले, उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, उपाध्यक्ष अभिजीत आल्हाट, चिटणीस सिद्धार्थ जन्नू, बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष विजय दळवी, महेश माने, सुप्रिया सोळांकुरे, रवींद्र सोनवणे, मनीष शेडगे, विशाल घोगरे, बाबा चौधरी, सुनिल अडागळे, गणेश हरजुळे, हरेश यादव, धनाजी तांबे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
पिंपरी मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा
- Advertisement -